
मासिक पाळी व महिला आरोग्य
यंग फाऊंडेशनतर्फे धडगाव व शिरपूर परिसरात महिलांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते.
मासिक पाळीविषयी समाजात अजूनही गैरसमज आणि भीती आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
या कार्यक्रमांतर्गत आम्ही खालील गोष्टी करतो:
- महिला आणि किशोरवयीन मुलींशी उघडपणे संवाद साधणे.
- आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व सोप्या भाषेत समजवून सांगणे.
- सुरक्षित सॅनिटरी पॅडचे नियमित वितरण करणे.
आमचा उद्देश महिलांना निरोगी आणि आत्मविश्वासी बनवणे हा आहे.