सातपुडा दुर्गम भागातील वास्तव आणि अनुभव.

नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुका मधील अतिदुर्गम नर्मदा नदी परिसरात मधील आदिवासी वास्तविकता आणि एक नवा भारत समजून घेण्याचा योग आमचे समित्र यंग फॉउंडेशन सक्रिय कार्यकर्ते श्री. संदीप देवरे याच्या मुळे मिळाला. निमित्त होते दिनांक 27 फ्रेबूवारी ते 03 मार्च 2026 या कालावधी मधील यंग फॉउंडेशन आयोजित युवा सवांद शिबीर उडदा ता. धडगाव जि. नंदुरबार या निवासी शिबीर. मागील 3 वर्ष पासून यंग फौंडेशन सातपुडा नर्मदा परिसर मध्ये लोकशिक्षण आणि प्राथमिक शिक्षण बाबत काम करीत आहे. या सर्व कार्याला जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. मागील 20 वर्ष पासून मी खान्देश मध्ये कॉलेज प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. पुस्तकं मधून आदिवासी प्रश्न आणि समस्या माहित करून घेतल्या यात काही आदिवासी भागात मी भेटी दिल्या आहे. मात्र युवा संवाद शिबीर निमित्त तोरणमाळ खाली सातपुडा आणि नर्मदा परिसरात प्रवास आणि पोहचणे जितके रोमांचकरी होते. तितकेच दुर्गम भागातील आदिवासी, वास्तविकता अनुभवयाला मिळाली. संदीप सर दुर्गम आदिवासी भागात सामाजिक जाणीवेचे काम करीत आहे. शासन आणि इतर सामाजिक काम करणाऱ्या NGO,CSR या भागात सहजा सहजी जात नाही. याला अपवाद संदीप सर याची यंग फॉउंडेशन मोठया हिम्मतिने काम करीत आहे. आदिवासी जीवन आणि निसर्ग याचे अतूट नाते आहे. याचा योग्य समन्वय साधून यंग फॉउंडेशन 09 निसर्ग संवाद शाळा पूर्ण:तहा लोक सहभागातून चालविल्या जातात. हे मात्र विशेष आहे. पाड्यातील तरुण शिक्षित मुलांनी शाळा चालविण्यासाठी पुढाकार घेत आहे. शिक्षणाची समस्या आणि आव्हाने यंग फॉउंडेशन शोधली त्यावर कृती कार्यक्रम, आराखडा यावर काम करीत आहे. लोकशिक्षणच्या माध्यमातून शासन, लोकसहभाग शासनयोजना याचा फायदा आदिवासी बांधवाना मिळवून देण्यासाठी संदीपसर धडपड करीत आहे. यात शासनचा अधिकारी यांना भेटून प्रश्न व समस्याची मांडणी करीत असतो. आणि विनम्र पद्धतीने सांगून सरते शेवट विनंती करतो साहेब सातपुडा नर्मदा परिसरात या अनुभव घ्या आणि आमचे प्रश्न सोडावा. संदीप सर मुळात त्याचा विनम्र स्वभावाने माणसच्या जगण्याचे समस्या कसे सोडवता येईल. सुंदर शब्द मध्ये मांडणी करत असतो. मी त्याना सहज विचारले इतकी ताकद कुढून मिळते. संदीप सर अगदी सोप्पा भाषेत सांगतात. निसर्ग जगण्याचे सकांरात्मक बळ देतो. स्वतः बरोबर बोलायचं शिकवतो. आणि उर्जा तयार होते सर्व नकारात्मक विचार बाजूला होतात आणि चांगले काम होते. संदीप सर म्हणजे माणुसकी चा अविरत झरा आहे. ते कधीच कोणाला नाराज करत नाही. आदिवासी समाजातील जाणीवा आणि निसर्ग ने दिलेली ताकद आहे.
मला काय मिळाले याबत म्हटलं तर
आदिवासी प्रश्न आणि समस्या याबाबत युवा सवांद शिबीर 2026 मधून नव्याने समजल्या दुर्गम भागातील आदिवासी जीवन, संस्कृती, स्री-पुरुष समानता, आदिवासी न्याय व्यवस्था. राजकीय भूमिका, श्रद्धा -अंधश्रद्धा या बाबीचा अनुभव महत्वचा होता. उडदा ता. धडगाव या गावातील लोकांनी निसर्ग बरोबर सपन्न आयुष्य कसे असते हे अनुभव ला मिळाले. सातपुडा व नर्मदा परिसर हा अनुभव आणि ज्ञान मिळविण्यासाठी जबरदस्त आहे. या निसर्गाने भरलेला अनुभव प्रवास मध्ये, शिलदार, वृषभ, अजय, अलोक, कृष्णा, अभिलाषा, संकेत, प्रमोद,मगर साहेब, पक्षीवर प्रेम असलेला डॉ. अलोक, सूरज, दीपक, निखिल, स्वप्नील, अनुप या सर्वच युवा बरोबर सवांद साधून आनंदायी अनुभव होता. नर्मदा नदी मधील प्रवास ही अतिशय उर्जादाय, आणि प्रेरणादायी ठरला. यात यंग फॉउंडेशन चे फेलो गणेश, मनीष, प्रवीण यांनी शिबीर साठी मोलाची मदत केली.
संदीपसर तुमचे आभार..
मी सातपुडा नर्मदा परिसर मध्ये पुन्हा पुन्हा येईन..
आपला स्नेहाकित
डॉ. राहुल आहेर