सर्वाधिक डॉक्टर असलेला आदिवासी पाडा.... गुऱ्हाडपाणी
Sandip Deore · 10 ऑगस्ट 2026
आणखी डॉक्टर
दैनिक भास्करने संपूर्ण भारतात सर्व भाषांच्या आवृत्तीत सातपुड्यातील गुऱ्हाडपाणी पाड्याची बातमी दिली आहे. यंग फाउंडेशनने बांबूच्या झोपडीत सुरु केलेले छोटेसे वाचनालय नीट परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त ठरतंय! रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क सह पुरेशा सुविधा नसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यामध्ये शिक्षणातील पहिलीच पिढी थेट डॉक्टर होतेय याचा आनंद आहे. डॉ. जगदीश पावरा यांनी सुरु केलेल्या पायवाटेवर पाड्यातील युवांचा प्रवास सुरुये. सातपुड्यात मदतीचा हात देणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या सर्व स्नेहीजनांना मनपूर्वक धन्यवाद ! सातपुड्यात जरूर या!