पाड्यावर पहिल्यांदाच नळाचे पाणी पोहचले...

सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणीटंचाई आहे. रस्ते वीज मोबाईल नेटवर्क नसलेल्या धडगाव तालुक्यातील अनेक पाड्यात पाण्यासाठी लोकांना वनवण भटकावे लागते. डोंगरदरीत असलेल्या झऱ्यातून, जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते. सरकारी यंत्रणा इकडे फक्त नावालाच आहे.


यंग फॉउंडेशन कार्यरत असलेल्या उडद्या, कुंड्या, झापी परिसरात मोठ्या प्रमाणात चारा व पाणी टंचाई आहे. या भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी DJED फॉउंडेशन चे दिलीप जैन यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. उडद्या परिसरसतील नर्मदेच्या काठावरील सादरी येथील पाड्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टचाई आहे. धरण उशाला अन कोरड घशाला अशी येथील परीस्थिती. महाकाय सरदार सरोवरतील पाणी समोर दिसत असून वापरता येत नाही.


सादरीच्या दोन पाड्यात पाणी आणायचं काम आव्हानात्मक. दोन्ही पाड्यात यंग फॉउंडेशनची टीमसह लोक सहभागातून नाला असलेल्या ठिकाणी छोटी विहीर खोदली मात्र एकाच ठिकाणी पाणी मिळाले तर दुसऱ्या ठिकाणी अगदीच थोडं पाणी लागले. त्यामुळं लोक निराश झाले. शेवटी नर्मदेच्या पत्रात सोलर पम्प टाकून पाणी आणायचं ठरले. धडगाव हुन भुषापर्यंत सोलर पत्रे व पंप गाडीतून आणले तर पुढे 7-8 किमी नदीतून नावेत प्रवास करत सामान पाड्यावर पोहचवले. पम्प बसवताना 2-3वेळा अगदी किरकोळ वस्तू आणण्यासाठी धडगावला 80 की मी चक्कर मारावे लागले. सोलर पंप बसवणारी टीम पाड्यावर दोन दिवस थांबली. नदीपासून पाड्यापर्यंत पाईप टाकून, पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहचले. नळ चालू झाल्यावर नळाखाली मुले मुली पाण्यात भिजली, कारण त्यांच्या पाड्यात पहिल्यांदा नळाला पाणी आले होते.


खरं तर या भागात सरकारी यंत्रणा सोडाच पण NGO देखील काम कारायला तयार नसतात. मात्र दिलीप जैन यांनी या दोन दुर्गम पाड्यात पाणी आणण्यासाठी मोलाचं योगदान दिले. यंग फॉउंडेशच्या शाळाबाह्य मुलांसाठी चालणाऱ्या निसर्ग संवाद शाळांमध्ये देखील त्याचा सहभाग आहेच. अजूनही अनेक पाड्यात पाणी पोहचवण्यासाठी मदतीची गरज आहेच.
Dilip Jain आपले व DJED फौंडेशन चे मनपूर्वक धन्यवाद!
नर्मदेचे पाणी प्रथमच आले अंगणी; नंदुरबार जिल्ह्यात सोलर पंपामुळे कमाल - Marathi News | Nandurbar Tribal Village Narmada Water Solar Pump Ngo Initiative Rak 94 - Latest Nashik News at Loksatta.com
https://www.facebook.com/share/p/18AC4osJwm/
- संदीप देवरे, यंग फॉउंडेशन